कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी बू. ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर या माझ्या शाळेतील परसबाग स्वच्छ ठेवण्याची मी आणि माझे सहकारी यांनी हाती घेतली होती. कारण ती विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त ठरते.
1. स्वच्छतेची जबाबदारी वाटप :
आम्ही प्रत्येक वर्गासाठी आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी स्वच्छतेची जबाबदारी ठरवली . विद्यार्थी गट तयार करून त्यांना परसबागेतील स्वच्छतेच्या कामांमध्ये सहभागी करून घेतले.
2. कचरा व्यवस्थापन :
ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी कचराकुंड्या ठेवल्या . ओला कचऱ्याचा वापर करून कंपोस्ट खत तयार करण्याची योजना आहे . प्लास्टिक व इतर हानिकारक कचऱ्याचा योग्य प्रकारे निपटारा केला .
3. झाडांची निगा राखणे :
परसबागेतील झाडांना नियमित पाणी विद्यार्थी देत असतात . अनावश्यक गवत, कोरड्या पानांचा आणि तुटलेल्या फांद्यांचा काढून टाकण्यात आला.
4. स्वच्छता मोहिमा :
महिन्यातून एकदा "स्वच्छता अभियान" आम्ही राबवितो , ज्यामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी सहभागी होतात . परसबागेची कापडी भिंत, पायवाटा, तसेच झाडे-फुलझाडे आम्ही नेहमी स्वच्छ करतो .
5. प्रशिक्षण आणि जागरूकता :
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम घेतले जातात . परसबागेचे संरक्षण कसे करायचे, हे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवितो .
6. सजावट आणि नियोजन :
परसबागेत विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे किंवा औषधी वनस्पती लावलेल्या आहेत . झाडांभोवती कुंपण घालून विद्यार्थी त्यांचे संरक्षण करतात .
स्वच्छ आणि सुंदर परसबाग विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करते तसेच पर्यावरण जतनासाठी प्रेरित करते.
No comments:
Post a Comment